Gold Silver Prices Down Saam TV
बिझनेस

Gold Silver Prices Down: दसऱ्याच्या आदल्या दिवशीच सोनं झालं स्वस्त; तुमच्या शहरात किती आहे भाव? लिस्ट बघा

Gold Silver Price Today: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Ruchika Jadhav

Gold Silver Prices Falling Today:

राज्यात सर्वत्र दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने अनेक जण दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरांत मोठी घसरण झाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दसऱ्याच्या आदल्या दिवशीच प्रतितोळा सोन्याचे दर ६१ रुपयांनी घसरलेत. सोन्याचा दर आज प्रतितोळा ६०६३२ रुपयांवर पोहचलाय. काल प्रतितोळा ६०६९३ रुपये इतका भाव होता. ११ मे २०२३ रोजी सोन्याने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ प्रतितोळा होता.

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव आज, सोमवारी ६१,४५० रुपये प्रतितोळा आहे. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोनं ६१४५० रुपये प्रतितोळा आहे. तसेच पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,४५० रुपये प्रतितोळा इतका आहे. सोलापुरात आज सोन्याचा भाव ६१,४५० इतकी आहे.

आज चांदीचे दर देखील घसरलेत. १ किलो चांदीची किंमत ७५,१०० रुपये इतकी आहे. मुंबई आणि पुण्यातही आज चांदीचे दर ७५,१०० रुपये इतकेच आहेत.

इस्रायल आणि हमासमधील युद्धामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ झालीये. गेल्या काही दिवसांत सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ज्वेलर्समध्ये शुकशुकाट दिसत होता. मात्र आज दर कमी झाल्याने आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं असल्यानं नागरिकांनी गर्दी केलीय. आज आणि उद्या असे दोन दिवस ज्वेलर्समध्ये गर्दी पाहायला मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Gondia Travel: मुंबईवरून गोंदियाला प्रवास करणार आहात? जाणून घ्या रेल्वे, बस आणि विमानाचे सर्व पर्याय

IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Maharashtra Live News Update : पुढचा कार्यक्रम ३ वाजता समजेल- राज ठाकरे

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Jui Gadkari Photos: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत

SCROLL FOR NEXT