Gold Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate Today: सोने उच्चांकी दरापेक्षा जवळपास 5000 रुपयांनी स्वस्त; चांदीही घसरली, दागिने खरेदीची संधी

Gold Rate Price Today (5 Oct 2023): सोन्याच्या दराच्या कालच्या तुलनेत आज 92 रुपयांची घट झाली आहे.

प्रविण वाकचौरे

Gold-Silver Rate in Maharashtra:

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरातील घसरण कायम आहे. आज देखील सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 56,561 रुपये प्रति तोळ्यावर ​​उघडला आहे. काल म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर 56,653 रुपये प्रति तोळे किंमतीवर बंद झाला होता.

सोन्याच्या दराच्या कालच्या तुलनेत आज 92 रुपयांची घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर मागील 5 दिवसात सोन्याच्या दरात जवळपास 1000 रुपयांची घसरण झाली आहे. (Finance News)

उच्चांक पातळीपेक्षा 5000 रुपयांचा स्वस्त

सोन्याच्या किंमतीने 11 मे 2023 रोजी आजवरचा उच्चांक दर गाठला होता. त्यादिवशी सोन्याची किंमत तब्बल 61585 रुपये प्रति तोळे होती. सोन्याच्या आजच्या दराची उच्चांकी किमतीशी तुलना केली तर सोने सध्या जवळपास 5000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. (Latest News)

चांदीच्या दरातही घसरण

सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण सुरुच आहे. चांदी सध्या आपल्या उच्चांक दरापेक्षा 9047 रुपयांनी स्वस्त विकली जात आहे. आज चांदीचा दर प्रति किले 67417 रुपयांवर उघडला आहे. आज चांदीच्या दरात 29 रुपयांची घसरण झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील 24 कॅरेट सोन्याचे दर

  • मुंबई - 57160 रुपये / प्रति तोळे

  • पुणे - 57160 रुपये / प्रति तोळे

  • ठाणे - 57160 रुपये / प्रति तोळे

  • नागपूर - 57160 रुपये / प्रति तोळे

  • नाशिक - 57190 रुपये / प्रति तोळे

  • सोलापूर - 57160 रुपये / प्रति तोळे

  • छत्रपती संभाजीनगर - 57160 रुपये / प्रति तोळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT