बँकेतील ग्राहकांना बँकिग सुविधेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील बँकांसाठी अनेक नियम आखले आहेत. ज्या बँक हे नियम पाळत नाहीत त्या बँकांना आरबीआय आर्थिक दंड आकारत असते. अशाच चार बँकांवर रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात आलीय. द सर्वोदय सहकारी बँक, धनेरा धानेरा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, द जनता को ऑपरेटिव्ह बँक आणि मणिनगर को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांवर कारवाई करण्यात आलीय. बँकांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नसल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलंय. (Latest News)
का करण्यात आली कारवाई
बँकेच्या संचालकांनी आपल्याच नातेवाईकांना कर्ज मंजूर करून दिलं. विशेष म्हणजे कर्ज घेणाऱ्यासाठी गॅरेंटर म्हणून स्वत: संचालकांनीच सही केल्याचा प्रकार द सर्वोदय सहकारी बँकेत घडल्याचं समोर आलंय. यामुळे आरबीआयनं या बँकेवर कारवाई करत मौद्रीक दंड लावण्यात आलाय. कारवाई झालेली दुसरी बँक म्हणजे मणिनगर सहकारी बँक या बँकेवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
जनता सहकारी बँकेवर ३.५० लाख रुपये, धनरे मर्केंटाईल बँकेला ६.५० लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय. प्रेस रिलीझनुसार, बँकेने आंतर- बँक प्रतिपक्ष एक्सपोजर मर्यादेचाही भंग केला होता आणि परिपक्वतेच्या तारखेपासून तारखेपासून परतफेडीच्या तारखेपर्यंत परिपक्व मुदत ठेवींवरील व्याज बचत ठेवींवर लागू असलेल्या दरानं किंवा व्याजाच्या करारनुसार होते, जे कमी असेल तर भरण्यात अयशस्वी झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान आजपासून रिझर्व्ह बँकेची मौद्रिक नीती समीक्षा बैठक बुधवारपासून सुरू होत आहे. या बैठकीत महागाई दर, जीडीपी ग्रोथ रेट यासह इतरही अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.