Bank News :बँक खात्यात कमीत कमी बँलेन्स किती असायला हवी? RBI चा नियम काय?

RBI Policy : बँकेत काही ठराविक रक्कम शिल्लक असणे अनिवार्य आहे.
Bank News
Bank NewsSaam Tv
Published On

RBI Rules For Minimum Balance :

प्रत्येक बँकेचे काही नियम असतात. ग्राहकांना त्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. काही नियम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असतात. सर्व बँकाना ते पाळावे लागतात. असाच एक नियम म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये नियमानुसार काही किमान शिल्लक असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

बँकेत काही ठराविक रक्कम शिल्लक असणे अनिवार्य आहे. असे न केल्यास अनेकदा बँका दंड किंवा शुल्क आकारतात. जर तुमच्याही अकाउंटमध्ये रक्कम नसेल अन् दंड लावल्यास काय होईल? दंडाची रक्कम किती असेल? यासाठी रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत.

Bank News
World Heart Day : रात्री झोपेत हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या कारणे आणि काळजी कशी घ्याल

किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास भरावा लागू शकतो दंड

बहुतेक बँकामध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवण्याबाबत नियम आहेत. त्यानुसार तुमच्या खात्यात नियमापेक्षा कमी रक्कम असल्यास दंड वसूल केला जाईल. शहरी भागात किमान रक्कम न ठेवल्याने जास्त रक्कम कापली जाते. तर तुलनेत ग्रामीण भागात शाखांमध्ये कमी पैसे कापले जातात.

आरबीआयचे गाईडलाइन्स

  • बँकाना एसएसएस, ईमेल किंवा पत्राद्वारे ग्राहकांना किमान रक्कम ठेवण्याची माहिती द्यावी लागेल.

  • सूचनेनंतर जर एका महिन्याच्या आत किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर दंड आकारला जाऊ शकतो.

  • बँक ग्राहकांना यासाठी मुदत देतात. हा कालावधी एक महिना किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो.

  • बँक एका महिन्यानंतर ग्राहकांना यासंबंधित माहिती देऊ शकते आणि दंड आकारु शकते.

बँकाना घ्यावी लागते परवानगी

RBI ने दिलेल्या गाईडलाइननुसार, दंड आकारण्यासाठी बँकाना त्यांच्या बोर्डाकडून परवानगी घ्यावी लागते. बोर्डाच्या मंजुरीनंतर चार्जिंग पॉलिसीनुसार हे दंड आकारले जातात.

नियम

किमान शिल्लक रक्कमेपेक्षा कमी प्रमाणात दंड आकारले जातात. ही रक्कम निश्चित टक्केवारीनुसार मोजली जाते. यासाठी बँक एक स्लॅबदेखील तयार करते. आरबीआयनुसार, दंड बँकाच्या सेवाच्या सरासरी खर्चापेक्षा कमी असावा

Bank News
Smoothies To Control PCOS: PCOS नियंत्रणात ठेवण्यासाठी या स्मूदी करतील मदत; झटपट होणाऱ्या रेसिपी पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com