Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price: आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं, १० तोळ्यामध्ये ५५०० रुपयांची वाढ, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Gold- Silver Prire Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला आज कात्री लागणार आहे. कारण सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. १० तोळ्यामध्ये ५५०० रुपयांची वाढ तर १ किलो चांदीमध्ये ३००० रुपयांची वाढ झाली आहे.

Priya More

Summary -

  • आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात तब्बल ५,५०० ची वाढ झाली

  • २४ कॅरेट सोन्याचा १ तोळा दर १,२४,२६० वर पोहोचला

  • २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,१३,९०० झाले

  • चांदीचे दर देखील वाढले. १ किलो चांदी ३००० रुपयांनी वाढली

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीने पुन्हा भाव खाल्ला. शुक्रवारी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली होती तर आज सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला. दिवाळीमध्ये सोनं खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल असतो पण सोन्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ पाहता ग्राहक नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ५,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. जर आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर त्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ५,५०० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,२४,२६० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ५,५०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,४२,६०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१३,९०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,३९,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४१० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९३,१९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,१०० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,३१,९०० रुपये मोजावे लागतील.

तसंच, आज चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. एक ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ३ रुपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी देखील चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली होती. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १७७ रुपये खर्च करावे लागतील. तर आज एक किलो चांदीच्या दरामध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज या चांदीची किंमत १,७७,००० रुपये इतकी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भररस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

SCROLL FOR NEXT