Gold Price: गुड न्यूज! दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं १८६०० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर

Gold Price Drop Today: आज सोन्याच्या दरात मोठी घसरण तर चांदीचे दर वाढले आहेत. १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १८६०० रुपयांनी घसरण झाली. तर एक किलो चांदीच्या दरामध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे.
Gold Price: गुड न्यूज! दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं १८६०० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर
Gold Price Drop Todaysaam tv
Published On

Summary -

  • दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • १० तोळा सोन्यामध्ये तब्बल १८,६०० रुपयांची घसरण

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे आजचे दर १,२२,२९० रुपये

  • २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण

  • चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे.आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १८,६०० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सोन्याचे दर जरी घसरले असले तरी चांदीने मात्र भाव खाल्ला आहे. चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,८६० रुपयांनी कमी झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,२२,२९० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १८,६०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,२२,९०० रुपये खर्च लागणार आहेत. त्यामुळे गुंतवणूक म्हणून आज २४ कॅरेटचे सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

Gold Price: गुड न्यूज! दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं १८६०० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर
Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामुळे आज हे सोन्याचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,१०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दरामध्ये तब्बल १७,००० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,२१,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

Gold Price: गुड न्यूज! दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं १८६०० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर
Gold Rate Prediction: १ लाख २३ हजार तोळा किंमतीच्या सोन्यामध्ये आता गुंतवणूक फायद्याची की तोट्याची? तज्ज्ञांनी दिलेला सल्ला वाचा

त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,३९० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९१,७२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३,९०० रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,१७,२०० रुपये मोजावे लागतील.

यासोबत आज चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. एक ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ३ रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी १७० रुपये खर्च करावे लागतील. तर आज एक किलो चांदीच्या दरामध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज या चांदीची किंमत १,७०,००० रुपये इतकी झाली आहे.

Gold Price: गुड न्यूज! दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं १८६०० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर
Diwali Gold Buying Tips: दिवाळीत सोने खरेदी करताय? या चुका टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com