Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात एका दिवसातच विक्रमी वाढ; खरेदीदारांना मोठा फटका, वाचा नवे दर...

Gold Silver Price Today: आज देशभरात सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या भावामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीचे भाव वाढताना दिसत आहे. आज जळगावात सोन्याचे भाव ७५,५०० रुपये झाले आहे. सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दररोज सोन्याच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सोने खरेदी करण्याचा विचारदेखील करु शकत नाही.

सोन्याचे भाव ७५ हजारांच्या पार गेले आहेत. यावर जीएसटी लागून ७७ हजार ८०० रुपये तुम्हाला १ तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार आहे. चांदीतही गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी चांदीच्या किंमतीत ३०० रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

गुडरिटर्न्सच्या वेबसाइटनुसार देशभरात २४ कॅरेट सोने ७६,३७० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. तर २२ कॅरेट सोने ७०,०१० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे.१८ कॅरेट सोन्याची किंमत ५७,२८० रुपये प्रति तोळा आहे.

महाराष्ट्रातील सोने चांदीचे भाव

मुंबई

२२ कॅरेट सोने- ७९,०१०

२४ कॅरेट सोने-७६,३७०

१८ कॅरेट सोने-५७,२८० रुपये प्रति तोळा

नागपूर

२२ कॅरेट सोने- ७९,०१०

२४ कॅरेट सोने-७६,३७०

१८ कॅरेट सोने-५७,२८० रुपये प्रति तोळा

पुणे

२२ कॅरेट सोने- ७९,०१०

२४ कॅरेट सोने-७६,३७०

१८ कॅरेट सोने-५७,२८० रुपये प्रति तोळा

चांदीची किंमत

आज देशभरात १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,२८० रुपये आहे. तर १००० ग्रॅम चांदीची किंमत ९२,८०० रुपये आहे. पुण्यात चांदीची किंमत ९,२८० रुपये आहे तर १०० ग्रॅम चांदी ९२,८०० रुपये आहे. दिल्लीत चांदीची किंमत ९२९ रुपये आहे तर १०० ग्रॅम चांदी ९२,९०० रुपयांवर विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT