बिझनेस

Gold-Silver Price Today: घसरणीनंतर सोने-चांदीचे दर भिडले गगनाला, संध्याकाळी चमकली चांदी

Gold Silver Price Today 16 August 2024: बाजार बंद झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीय. आज शुक्रवारी 16 ऑगस्टला सोने आणि चांदी महाग झाल्याचे पाहायला मिळालं.

Bharat Jadhav

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती, मात्र सणासुदीचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्यात. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्यादिवशी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी पाहायला मिळाली. आता रक्षाबंधनाचा सण येत आहे, त्याआधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसतेय. आज शुक्रवारी संध्याकाळी 16 ऑगस्ट रोजी सोन्या-चांदीची किंमत किती आहे? हे जाणून घेऊ.

आज 16 ऑगस्ट 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांनी वाढली होती. त्यानंतर 65,550 रुपयांची किंमत 65,650 रुपये झाली. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅम प्रति 110 रुपयांची वाढ झालीय. त्यानंतर 71,620 रुपयांची किंमत 71,510 रुपये झाली. चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची वाढ झाली. चांदीचा नवीन दर 83,500 रुपयांऐवजी 84,000 रुपये झाला.

महानगरांमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम

सोन्याचे दर २२ आणि २४ कॅरेट

दिल्ली - सोने (22K) - 65800 , (24K) 71770

मुंबई- (22K) 65650, 71620 (24K) .

चेन्नई- (22K) 65650, 71620 (24K) .

महानगरांमध्ये चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम

दिल्ली 84,000

मुंबई 84,000

कोलकाता 84,000

चेन्नई 89,000

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT