Gold Rate News : सोन्याची किंमत एक लाख रुपये होणार? कशामुळे वधारणार भाव?

जगात सोनं घेण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत. आता वर्षअखेर सोन्याची किमंत लाखो रुपयांवर पोहोचेल असे सांगितले जात आहे.

दिवसेंदिवस सोन्याची झळाळी वाढतच चाललीय. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद सोने-चांदीच्या दरांवर पडत असतात. 2024च्या अखेरपर्यंत सोन्याचे दर 1 लाखावर जाण्याची अंदाज काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय. वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याचे दर वाढतच चालले आहेत. सध्या सोन्याचा दर ७३ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत सोनं एक लाखाच्या घरात जाऊ शकतं, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे... दरम्यान वाढता वापर पाहता चांदीचे दरही लाख रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे. अनेक मध्यमवर्गीय कुटुंब सोन्यात गुंतवणूक करत असतात. त्यांना याचा फायदा होईल. मात्र ज्यांना आगामी काही महिन्यात लग्नसराईसाठी किंवा हौसेखातर सोनं खरेदी करायचं असेल त्यांचा मात्र दर पाहून हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com