Gold Price Today  Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : ३ दिवसात सोनं ४००० रुपयांनी महागलं, सुवर्णबाजारात दर वाढ का झाली?

Jalgaon Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. ऐन लग्नसराईच्या वेळेत ही वाढ झाल्यामुळे ग्राहकांंचं टेन्शन वाढलं आहे.

Sakshi Sunil Jadhav

जळगाव

संजय महाजन जळगाव

जळगावात सोनं – चांदीच्‍या किंमतीत होत असलेली घसरण थांबली असून मागच्या दोन दिवसांपासून याच्या किंमतीत पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. यात सलग दुसऱ्या दिवशी भाव मोठ्या फरकाने वधारले असून आज (ता.२७) सोनं अडीच हजार तर चांदीच्‍या भावात सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सराफ बाजारात मागील काही दिवस खाली आलेल्‍या भावांचा आलेख आता पुन्‍हा वर जाऊ लागला आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेतील बदलाचा परिणाम जळगावच्‍या सराफ बाजारावर होताना दिसत आहे. आठवड्याच्‍या सुरवातीला सलग मोठ्या फरकाने भाव खाली आल्‍याचे चित्र होते. यामुळे खरेदीदारांसाठी दिलासादायक चित्र होते. परंतु दोन दिवसांपासून सोने– चांदीच्‍या भावात वाढ होत आहे. मागील दोन दिवसात सोने साडेचार हजार तर चांदी नऊ हजार रुपयांनी वधारली आहे.

सोने अडीच हजाराने महागले

सोने– चांदीच्‍या भावात अस्थिरता कायम असून खाली आलेले भाव पुन्‍हा मोठ्या फरकाने वाढू लागले आहेत. गुरूवारी झालेल्‍या वाढीनंतर आज पुन्‍हा मोठी वाढ झाली. यात गुरूवारी (ता. २६) सोन्याचा भाव एक लाख २४ हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. शुक्रवारी (ता.२७) यात अडीच हजार रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख २६ हजार ५०० रुपयांवर आले आहे. तर चांदीच्‍या भावात तब्‍बल सहा हजार रुपयांची वाढ झाल्‍याने चांदी एक लाख ५२ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवरून एक लाख ५८ हजार रुपयांवर पोहोचले आहे.

काही दिवसांतील सोने-चांदीचे भाव

२२ नोव्‍हेंबर - १ लाख २३ हजार ५०० (प्रतिदहा ग्रॅम) - चांदी १ लाख ५४ हजार (प्रतिकिलो)

२३ नोव्‍हेंबर - १ लाख २६ हजार २०० - १ लाख ५७ हजार

२४ नोव्‍हेंबर - १ लाख २६ हजार ८०० - १ लाख ५८ हजार

२५ नोव्‍हेंबर - १ लाख २२ हजार - १ लाख ४९ हजार

२६ नोव्‍हेंबर - १ लाख २४ हजार - १ लाख ५२ हजार

२७ नोव्‍हेंबर - १ लाख २६ हजार ५०० - १ लाख ५८ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress And Diabetes : जास्त टेन्शन घेता? सावधान! होऊ शकतो मधुमेहाचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती

Winter Skincare : हिवाळ्यात अंघोळ करणे त्रासदायक? जाणून घ्या बेस्ट बार्थ टायमिंग

पुण्यात सोशल मीडियावर मैत्री अन् महिलेची फसवणूक; दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचं आमिष दाखवून दुचाकी, मोबाईल लंपास

Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

Navi Mumbai : नवी मुंबईत सशस्त्र दरोडा! व्हॅनमधून २० कोटींचं सोनं लुटलं; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT