Today's Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Today's Gold Silver Rate : लग्नासाठी दागिने बनवायचेत? मग आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या

(6 May 2024) Gold Silver Price In Maharashtra: उन्हाळ्यात मे आणि जून महिन्यातील मुहूर्तांमध्ये लग्नाच्या तयारीत आहेत. अशात दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झालीये. आजही सोन्याचे भाव काहीप्रमाणात वाढले आहेत.

Ruchika Jadhav

देशभरात सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. या वर्षी मोजकेच मुहूर्त आले असून जून महिन्याच्या ३० तारखेपर्यंत मुहूर्त आहेत. ३० तारखेचा शेवटचा मुहूर्त आहे. त्यानंतर पुढील मुहूर्त दिवाळीत आहेत. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात मे आणि जून महिन्यातील मुहूर्तांमध्ये लग्नाच्या तयारीत आहेत. अशात दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झालीये. आजही सोन्याचे भाव काहीप्रमाणात वाढले आहेत.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

सोन्याच्या दरात आज प्रति तोळा २०० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किंमती देखील २०० रुपयांनी वाढल्या असून प्रति तोळा सोनं आज ६६.२०० रुपये प्रति तोळावर पोहचलं आहे. काल याच सोन्याचे दर ६६,००० प्रति तोळा होते. १०० ग्राम सोन्याच्या किंमती २,००० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६२,००० रुपयांवर पोहचली आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

आज २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीतही २२० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे काल ७१,९८० प्रति तोळा मिळणारं सोनं आज ७२,२०० रुपये प्रति तोळा रुपयांनी विकलं जात आहे. तर १०० ग्राम सोन्याचे दर २,२०० रुपयांनी वाढलेत. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत आज ७,२२,००० रुपये इतकी आहे.

पुण्यातला भाव काय?

पुण्यात २२ कॅरेट सोने ६६,०५० रुपये प्रति तोळा, तर २४ कॅरेट सोनं ७२.०२० रुपये प्रति तोळा आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याची किंमत ५४,०४० रुपये प्रति तोळा आहे.

मुंबईतील सोन्याचा भाव

मुंबईमध्ये देखील २४ कॅरेट सोनं ७२.०२० रुपये प्रति तोळा आहे. तर २२ कॅरेट सोनं ६६,०५० रुपये प्रति तोळा. तसेच १८ कॅरेट सोन्याची किंमत ५४,०४० रुपये प्रति तोळा आहे.

चेन्नईमध्ये ६६,१०० रुपये प्रति तोळा, कोलकत्तामध्ये ६६,०५० रुपये प्रति तोळा, नवी दिल्लीत ६६,२०० रुपये प्रति तोळा सोनं आहे.

चांदीचे दर

चांदीच्या दरांमध्ये देखील आज वाढ झाली आहे. आज १ किलो चांदी १००० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे चांदीची किंमत ८४,००० रुपये इतकी आहे. मुंबईत चांदी ८४,००० किलो आणि पुण्यात देखील ८४,००० रुपये किलोने विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धावत्या पीएमपीएमएल इक्ट्रिक बसने घेतला पेट

Bigg Boss 19: झिशान कादरीने तान्या मित्तलला दिला धोका; बिग बॉसच्या घरात नेमंक चाललंय तरी काय?

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार, बोनससह सानुग्रह अनुदानात वाढ

Chanakya Niti: खुश राहण्यासाठी 'या' सिक्रेट टिप्स करा फॉलो, चाणक्यांचा खास सल्ला

Nandurbar Zp School : दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेची 'तीन'लाच सुट्टी; विद्यार्थी वाऱ्यावर सोडून शिक्षक दुपारीच फरार

SCROLL FOR NEXT