एप्रिल महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोन्याच्या भावात चढ-उतार झालेली पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात सुरुवातीला घसरण झाली होती तर चांदीचे दर स्थिर होते.
आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोन्याने भाव खाल्ला आहे. तर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. काल सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली होती. मार्च-एप्रिल महिन्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक भाव नोंदवला होता.
चांदीच्या दराने १० दिवसांतील नरमाईला ब्रेक दिला. काल चांदी २ हजारांनी वधारली तर सोन्याने पण मुसंडी मारली आहे. सोन्याच्या भावात आज पुन्हा २२० रुपायांनी वाढली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,७०० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७३,०८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात २२० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८४,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)
मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,९३० रुपये
पुणे (Gold Price in Pune) - ७२,९३० रुपये
नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,९३० रुपये
नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,९६० रुपये
ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,९३० रुपये
अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,९३० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.