(29th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोन्याच्या भावात तेजी, चांदीच्या दरात उसळी; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील नवे दर

(29th March 2024) Gold Silver Price In Maharashtra: मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांक पातळी ओलांडली आहे. महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसात धातूच्या भावात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

24k Gold Silver Rate In Maharashtra:

मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांक पातळी ओलांडली आहे. महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसात धातूच्या भावात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली. होळीपूर्वी सोन्याचे भाव नरमले होते परंतु, होळीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

मागच्या आठवड्यात सोने १५०० रुपयांनी तर चांदी २८०० रुपयांनी महागली. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला आहे.

सोन्याचा भाव लवकरच ७० हजारांचा आकडा पार करु शकतो असे मत सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी नोंदवले. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,३१५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६८,८८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात १,४२० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,८०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६८,७३० रुपये

  • पुणे - ६८,७३० रुपये

  • नागपूर - ६८,७३० रुपये

  • नाशिक - ६८,७६० रुपये

  • ठाणे - ६८,७३० रुपये

  • अमरावती - ६८,७३० रुपये

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT