(12th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोन्याचा विक्रमी उच्चांक, चांदीचे दर गगनाला; वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे दर

(12th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईच्या वेळी सोन्या-चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांना टेन्शन आले आहे.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईच्या वेळी सोन्या-चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांना टेन्शन आले आहे. सोन्याच्या वाढत्या भावामुळे सोनं-चांदी खरेदी करावे की, नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.

गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. परंतु, त्यानंतर सोन्याच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२, २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते.

तब्बल तीन दिवसात सोन्याच्या भावात हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात १५०० रुपयांनी वाढ झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत आहे. पहिल्या दहा दिवसात सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली होती. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून भाव वाढीचे सत्र सुरुच आहे.

सराफ बाजारातील व्यापाऱ्यांच्या मतानुसार सोने लवकरच ७५ हजारांचा आकडा गाठू शकते. सोन्याच्या भाव वाढीचे कारण अमेरिकन बँकांची स्थिती खराब असल्यामुळे मार्च महिन्यापासून दरात वाढ झालीये. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,७३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७३,४६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात १०९० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८६,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७३,३१० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७३,३१० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७३,३१० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७३,३४० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७३,३१० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७३,३१० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT