Gold Silver Price Down Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Down : सोन्यासह चांदीचा भाव पुन्हा उतरला; वाचा मुंबई-पुण्यातील आजचे दर

Gold Silver Price Fall (14 June 2024) : आज २२ कॅरेट सोन्याचा भाव २००० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६०,५०० रुपये इतकी आहे.

Ruchika Jadhav

लग्नसराई अद्याप संपलेली नाही. जून महिन्याच्या अखेरपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे या वर्षीच तुमच्याही लग्नाचा योग जुळला असेल तर दागिने बनवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कारण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर तब्बल २,५०० रुपयांहून जास्त घसरले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव २००० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६०,५०० रुपये इतकी आहे. तर १० ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत २०० रुपयांनी कमी झाली असून सोनं ६६,०५० रुपयांवर पोहचलं आहे. ८ ग्राम सोन्याची किंमत आज ५२,८४० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती सुद्धा कमी झाल्यात २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचे दर २,७०० रुपयांनी कमी झालेत. त्यामुळे आज सोनं ७,२०,४०० रुपयांवर पोहचलं आहे. १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव २७० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव २१६ रुपये आहे.

विविध शहरांतील एक ग्राम सोन्याचे दर

चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६६० रुपये आहे.

मुंबईत ६,६५ रुपये आहे.

दिल्लीत ६,६२५ रुपये आहे.

कोलकात्यात सोन्याचा भाव ६,६१५ रुपये आहे.

केरळमध्ये सोन्याचा भाव ६,६१५ रुपये आहे.

तर बंगळुरूमध्ये देखील सोन्याची किंमत ६,६१५ रुपये इतकी आहे.

चांदीच्या किंमती

चांदीच्या किंमती देखील २०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे एक किलो चांदी ९०,५०० रुपयांना विकली जातेय. तर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा राज्यातील अन्य शहरांत देखील चांदीचा भाव प्रति किलो ९०,५०० रुपये इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT