दिवाळीच्यानंतर तुळशीचे लग्न झाल्यावर सुरु होतो लग्नसराईची काळ. अनेक घरात सनई चौघडे वाजू लागतात. परंतु, लग्न करण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो.
हॉल बुक करण्यापासून कपडे-दागिन्यांची खरेदी केली जाते. ही खरेदी फक्त वधू-वर करत नाही तर त्यांच्या जवळचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात देखील करतात. यामुळे देशात लग्ननाच्या काळात अब्जावधी रुपयांचा व्यवसाय होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारतात (India) लग्नसराईचा विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक विधीही महत्त्वपूर्ण असून त्यासाठी अधिक पैसे (Money) देखील खर्च केले जातात. यंदा लग्नसराईचा मुहूर्त हा २३ दिवस असणार आहे. त्यामुळे देशभरात या काळात ४.२५ लाख रुपये खर्च होतात असे मत नोंदवण्यात आले आहे. तसेच देशभरात प्रत्येक सेकंदाला २१.३७ लाख रुपये खर्च होणार आहे.
1. देशात ३५ लाखांहून अधिक विवाह सोहळा पार पाडणार
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा मते २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत ४.२५ ट्रिलियन रुपये अर्थात ५१ अब्ज डॉलरची विक्री केली जाईल. म्हणजेच या काळात लग्नाच्या खरेदीवर २१.३७ लाख रुपये खर्च केले जातील. दिवाळीनंतर (Diwali) लग्नसराईच्या मुहूर्तावर प्रत्येक सेकंदाला सरासरी २१ लाखांपेक्षा जास्त खर्च केला जाऊ शकतो. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत ३५ लाखांहून अधिक विवाह होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2. ४.२५ लाख कोटींची होणार उलाढाल
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी दागिने, कपडे, शूज आणि डिझायनर कपड्यांवर अधिक खर्च केला जाऊ शकतो असे मत मांडले आहे. यामध्ये नोव्हेंबर ते जानेवरी महिन्यात ८ ते ११ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. वाढत्या महागाईचा फटका बसत असला तरी, पहिल्या आठवड्यात व्यापारी वर्गाला दिलासा मिळू शकतो. भारतीय लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांवर अधिक प्रमाणात खर्च केला जातो.
3. देशात सोन्याची मागणी वाढणार
देशात सोन्याची वाढती मागणी ही सुमारे ८०० टन आहे. त्यातील निम्म्याहून अधिक खरेदी लग्नसराईच्या काळात केली जाते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश म्हणून ओळखला जातो. तसेच सोन्याच्या मोठ्या व्यापारांना यावेळी अधिक फायदा होऊ शकतो.
4. वाढत्या किंमतीचा खरेदीवर परिणाम होईल?
मिळालेल्या माहितीनुसार मेटल्स फोकस लिमिटेडचे प्रमुख सल्लागार चिराग शेठ म्हणतात, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असेल. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा दागिन्यांवर फारसा परिणाम करणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.