Gold Price Saam Tv
बिझनेस

Gold Rate : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त, चांदीचा भावही घसरला; वाचा २२ कॅरेट-२४ कॅरेटचे आजचे दर

Todays Gold Rate in Mumbai Pune Jalgaon Maharashtra : लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹700 घट, तर चांदी ₹3,000 प्रति किलोने स्वस्त झाले आहे.

Namdeo Kumbhar

gold rate today Jalgaon Mumbai Pune Delhi : लग्नसराईतला सुरूवात झाली आहे. त्यातच आता सोन्याच्या दरातही मागील आठवडाभरापासून सातत्याने घट झाल्याने लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. बुधवारी सराफा बाजार उघडताच पुन्हा एखादा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली, त्याशिवाय चांदीचे दरही कमी झाले. जळगाव, मुंबई, पुण्यापासून दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यामध्येही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आलेय. आज प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ७१ रूपयांनी कमी झाली आहे.म्हणजे, प्रतितोळा सोनं ७०० रूपयांनी स्वस्त झाले आहे.

लग्नसराईत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने नवे उच्चांक गाठले होते. त्यामुळे लग्नात सोने खरेदी करायचे की नाही? असा सवाल सर्वसामान्यांना पडत होता. पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आजचा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. प्रति ग्रॅम ७१ रूपयांनी सोनं घसरले. तर चांदीच्या दरात प्रति किलो ३ हजार रूपयांची घसरण पाहायला मिळाली.

भारतात सोन्याचे दर -

भारातमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२२४६ रूपये इतका आहे. मंगळवारी याची किंमत १२३१७ रूपये इतकी होती. मंगळवारच्या तुलनेत प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१ रूपये स्वस्त झालेय. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ६५ रूपयांनी तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ५४ रूपयांनी घसरली आहे.

भारतात चांदीचे दर काय ?

गेल्या काही दिवसांत सोन्याप्रमाणेच चांदीचे दरानेही इतिहास रचला होता. पण आता चांदीच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. भारतात आज चांदीचे दर प्रति किलो १५१००० रूपये इतकी झाली आहे. मंगळवारी, चांदीची किंमत १५४००० रूपये इतकी होती. म्हणचे, एका दिवसात ३ हजार रूपयांनी चांदी स्वस्त झाले आहे.

जळगावात मंगळवारी सोने ५१५ रूपयांनी स्वस्त, लवकरच तेजीचा अंदाज

जळगावच्या सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी, १०३ रुपयांनी वाढलेले सोने दुसऱ्या दिवशी ५१५ रुपयांनी घसरले. मंगळवारी सोन्याचा प्रती तोळ्याचा दर १,२४, २१८ रुपयांवर स्थिरावला.गेल्या शुक्रवारी सोने अवघ्या २०६ रुपयांनी वाढून १,२४,६३०० रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी आठवड्याची सुरुवात तेजीने झाली. सोने १०३ रुपयांनी वाढून १,२४,७३३ रुपयांवर आले, त्यानंतर मंगळवारी ५१५ रुपयांनी घसरून १,२४,२१८ रुपये तोळ्यावर आले. दरम्यान,ही घसरण किरकोळ असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तर चांदी दोन दिवसांपासून १,५६,५६० रुपये किलो आहे.ट्रम्प टेरीफमुळे यंदा २१ एप्रिल रोजी पहिल्यांदा सोने १ लाखांवर गेले त्यानंतर सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस दराचा विक्रम गाठत आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच सोने १३५१३६ चा सर्वकालिन उच्चांकावर पोहोचले होते तर चांदीनेही सोन्याला मागे टाकत १५ ऑक्टोबरलाच १,९०,५५० रुपये किलोच्या विक्रमी दरावर पोहोचले होते. त्यानंतर दरात घसरण झाली असली तरी तेजीची अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Maharashtra Live News Update: कल्याणातील रिंगरोड टप्पा ३ च्या कामाला वेग,आठ महिन्यांत पूर्णत्वाचा निर्धार

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

Government Employees: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे नियम केले स्पष्ट; पेन्शनसाठी होणार फायदा

SCROLL FOR NEXT