Gold Silver Rate (26th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (26th September): सोन्याला उतरती कळा, चांदीही गडगडली; १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today's 26th September Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्याच्या भावात किचिंत घसरण झाली आहे. पाहूया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (26th September):

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याचे भाव ६० हजारांपर्यंत पोहोचले होते. मे-जून महिन्यात सोन्याचे भाव अधिक वाढले होते तर सप्टेंबर महिन्यात पडझड पाहायला मिळाली.

आज सकाळच्या सत्रात सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पडझड पाहायला मिळाली. तसेच डॉलरच्या किंमतीतही घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या भावात किचिंत घसरण झाली आहे. पाहूया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याच्या घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५१० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,१०० रुपये मोजावे लागले होते तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९० रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५९,८८० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २४ कॅरेटमध्ये २२० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीच्या दरात वाढ

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या १० ग्रॅमसाठी ७५८ रुपये मोजावे लागले होते. तर आज १० ग्रॅम ७४८ रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या भावात प्रति किलोने १०० रुपयांनी घसरण झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,730 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,730 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,760 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT