(20th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात उसळी, चांदीच्या वाढत्या दराला ब्रेक; जाणून घ्या शहरातील नवे दर

(20th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: सोन्या-चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसून येत आहे. लग्नसराईचा काळ असल्यामुळे खरेदीदारांचा अधिक कल हा धातुंच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

सोन्या-चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसून येत आहे. लग्नसराईचा काळ असल्यामुळे खरेदीदारांचा अधिक कल हा धातुंच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक ओलांडला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात सोन्याच्या भावात साधरणत: १५०० रुपयांनी वाढ झाली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंमध्ये उसळी झालेली पाहायला मिळाली. आज स्थानिक बाजारात सोन्याचे दर उसळले तर चांदीच्या वाढत्या दराला ब्रेक मिळाला आहे.

या आठवड्याभरात सोने २१४० रुपयांनी वधारले. १८ एप्रिलला ३३० रुपयांनी घसरण झाली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. लवकरच सोन्याचा भाव ८० हजारांचा टप्पा गाठू शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,८२१ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७४,३९० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold)भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८६,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीचे भाव स्थिर आहेत.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७४,२४० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७४,२४० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७४,२४० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७४,२७० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७४,२४० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७४,२४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT