Today's Gold Silver Rate: लग्नसराईत ग्राहकांना झटका! सोन्याच्या दरात वाढ, चांदीही चकाकली; वाचा आजचे दर

(19th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: मागच्या दोन महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. लग्नसराईचा काळ असल्यामुळे खरेदीदारांचा अधिकचा कल हा धातुंच्या किमतीवर पाहायला मिळाला आहे.
(19th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
(19th April 2024) Gold Silver Price In MaharashtraSaam Tv
Published On

24K Gold and Silver Price in Maharashtra:

मागच्या दोन महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. लग्नसराईचा काळ असल्यामुळे खरेदीदारांचा अधिकचा कल हा धातुंच्या किमतीवर पाहायला मिळाला आहे.

एप्रिल महिना सुरु झाल्यापासून सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक ओलांडला. पहिल्या पंधरा दिवसात सोन्याच्या भावात १५०० रुपयांनी वाढ झाली. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने ७२ हजारांचा टप्पा ओलांडला होता तर दोन दिवसांपूर्वी सोनं ७५ हजारांवर येऊन ठेपले.

जळगाव सारख्या शहरात सराफ बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. २४ कॅरेटनुसार जीएसटीसह सोन्याचा भाव हा ७५ हजार ३६० रुपये तर चांदी ८६ हजार ५०० रुपये इतकी झाली आहे.

(19th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Petrol Diesel Rate 19th April 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार?

सोन्या-चांदीच्या वाढत्या भावामुळे सराफ बाजारातील व्यापारांना टेन्शन आले. यामुळे आर्थिक फटक्यांचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसात भाव अजून वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,८३० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७४,४९० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold)भावात ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८६,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीचे भाव स्थिर आहेत.

(19th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Summer Vacation : उन्हाळ्यात फिरण्यासाठी ही ठिकाणं परफेक्ट, ऑफबीट हील स्टेशनला लुटा सुट्टीचा आनंद

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७४,३४० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७४,३४० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७४,३४० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७४,३७० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७४,३४० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७४,३४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com