Summer Vacation : उन्हाळ्यात फिरण्यासाठी ही ठिकाणं परफेक्ट, ऑफबीट हील स्टेशनला लुटा सुट्टीचा आनंद

Summer Off Beat Destination : वाढत्या उष्णतेमुळे आपल्या सगळ्यांच्या अंगाची लाहीलाही झालीये. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे आपण फॅमिलीसोबत बाहेर फिरण्याचा प्लान करतो. परंतु, इतक्या उन्हात नेमके जायचे कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका.
Summer Vacation
Summer VacationSaam tv
Published On

Summer Travel Trip :

वाढत्या उष्णतेमुळे आपल्या सगळ्यांच्या अंगाची लाहीलाही झालीये. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे आपण फॅमिलीसोबत बाहेर फिरण्याचा प्लान करतो. परंतु, इतक्या उन्हात नेमके जायचे कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका.

उन्हाळ्यात आपल्या थंड ठिकाणी फिरावेसे वाटते. उन्हाळयात जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरु शकतात. ही ठिकाणे थोडी ऑफबीट (Offbeat Destination) आहेत. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. या ठिकाणी गर्दी देखील कमी असेल. कमी बजेटमध्ये (Budget) तुम्ही सुट्टीचा आनंद लुटू शकता.

उन्हाळ्यात (Summer Season) अनेकजण फिरायला जाण्यासाठी पर्यटनस्थळे सर्च करतात. मुंबई, गोवा, मनाली, महाबळेश्वर आणि चिखलदरा इत्यादी ठिकाणांनी आपण नेहमीच भेट देतो. पण या ठिकाणांना भेट देऊन कंटाळले असाल तर तुम्ही या भन्नाट पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता.

1. लाचुंग

लाचुंग हे सिक्कीममधील एक ठिकाण आहे. येथे जाण्यासाठी सिक्कीमची राजधानी गंगटोकला जावे लागेल. येथे सुंदर दऱ्या आणि आल्हादायक हवामान असेल. येथे तुम्ही ट्रेकिंगही करु शकता. या ठिकाणी तुम्हाला होम स्टेचा पर्याय देखील मिळेल.

Summer Vacation
Mumbai-Pune Travel Plan : मुंबई-पुण्याजवळ फिरण्याचा प्लान करताय? IRCTC चे भन्नाट टूर पॅकेज पाहा

2. नौकुचियातल

उत्तराखंडमधील भीमताल आणि नैनीतल यामध्ये वसलेल्या नौकुचियातल या ठिकाणी फिरु शकता. येथे तुम्हाला सुंदर पर्वतरांगा, नौकाविहार आणि पॅराग्लायडिंग सारख्या गोष्टी करता येतील.

3. चकराता

उत्तराखंडमध्ये मसुरी, नैनिताल यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे आहे. याच्या जवळपास चकराता हे ठिकाण आहे. या ठिकाणी (Travel) तुम्ही स्कीइंग, रॅपलिंग, टायगर फॉल यांसारख्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com