(17th April 2024) Sone Chandi Bhaav
(17th April 2024) Sone Chandi Bhaav Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोनं ७५ हजार पल्ल्याड, चांदीच्या दरातही वाढ; वाचा आजचे नवे दर

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

सध्या देशभरात लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे खरेदीदारांचा कल हा धातुंच्या किमतीवर असतो. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक ओलांडला होता. या आठवड्यात दोन दिवसात धातूंच्या किमतीत १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याचे भाव काल ७५ हजारांवर पोहोचले. काल जळगाव शहरातील सराफ बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७५ हजार ३७० रुपयांवर पोहोचला तर चांदी ८६ हजार ५०० रुपये झाली आहे.

सोने आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे सराफ बाजारातील व्यापारांना टेन्शन आले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटक्यांचा सामना करावा लागला आहे. सोन्यातील चढ-उतार कायम राहिला तर लवकरच दरवाढीत आणखी वाढ होऊ शकते. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,८१० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७४,२८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याचे (Gold) भाव स्थिर पाहायला मिळाले आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८६,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७४,१३० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७४,१३० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७४,१३० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७४,१६० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७४,१३० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७४,१३० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: एक महिना कांदा खाल्लाच नाही तर काय होईल?

पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका

Pune Police PC Hit And Run Case | दोषींवर कडक कारवाई करणार, पोलीस ॲक्शन मोडवर

Unseasonal Rain : नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका; केळी आणि पपई बागांचे नुकसान

HSC Result 100% Mark: बारावीत 100 टक्के मार्क मिळवणारी ती मुलगी कोण? उत्तर मिळालं!

SCROLL FOR NEXT