सोन्याच्या दरात वाढ
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,६६० रुपये
सोन्याच्या दरात प्रति तोळा २२० रुपयांची वाढ
चांदीचा दर प्रति किलो २ लाख ३० हजार रुपये
सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ नोंदवण्यात आली असून, त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. काल सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आजही बाजारात तेजी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.एक तोळा सोन्याचा दर १ लाख ४७ हजार ६६० रुपये इतका झाला आहे. आज सोन्याच्या किमतीत प्रति तोळा २२० रुपयांची वाढ झाली आहे. सलग दरवाढीमुळे सोने खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
दुसरीकडे, चांदीच्या दरानेही ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. सध्या चांदीचा भाव प्रति किलो २ लाख ३० हजार रुपये इतका आहे. लग्नसराई, सण-उत्सव आणि इतर शुभकार्यांसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही दरवाढ महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी आपल्या शहरातील सराफा बाजारातील ताजे दर तपासून घेणे आवश्यक आहे.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,७६६
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१८,१२८
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४७,६६०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,७६,६००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,५३५
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०८,२८०
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३५,३५०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,५३,५००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,०७४
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८८,५९२
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१०,७४०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,०७,४००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.