Gold Rate Today News  AI image
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

Gold Silver Price Today : आजच्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव १,४८,८०० रुपये झाला असून २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दरही जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव १,४८,८०० रुपये झाला आहे

  • पितृपक्षानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या खरेदीकडे बाजाराचे लक्ष

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू झाल्यानंतर सोने-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांकडून काही प्रमाणात पाठ फिरवली जाते. या काळात मौल्यवान धातूंची खरेदी करणे अनेकजण टाळतात. मात्र, याच काळात सराफा बाजारातून खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली असून, त्यामुळे आगामी सणासुदीच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे.

सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात पुन्हा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. आज १ तोळा म्हणजेच १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३७० रुपयांनी घसरून १,४८,८०० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या दरामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, १०० ग्रॅम म्हणजेच १० तोळे २४ कॅरेट सोन्याचा दर १४,८८,००० रुपये इतका झाला आहे. विशेषतः नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात सोन्याची मागणी वाढत असल्याने सध्याच्या दरातील बदल महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या सोन्याच्या किमतीत झालेली घसरण कायम राहते की पुन्हा दरवाढ होते, याकडे सराफा बाजारासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,८८०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१९,०४०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४८,८००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,८८,०००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,६४०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०९,१२०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३६,४००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,६४,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,१६०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८९,२८०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,११,६००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,१६,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matang Samaj Morcha : 'शासन निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही' मुंबईत मातंग समाज आक्रमक

Maharashtra News Live Update: पुण्यात वडगाव शेरीत मोकाट सोडलेल्या कुत्र्याचा १२ वर्षीय मुलावर हल्ला

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

SCROLL FOR NEXT