सोने चांदीच्या दरात वाढ
चांदी ५००० रुपयांनी महागली
वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर
सोने-चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहेत. सोन्याचे दर आजदेखील वाढले आहेत. कालदेखील सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. त्यानंतर आजदेखील सोन्याचे दर वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांची वाढ झाली आहे.सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव.
रोज सकाळी सोन्याचे नवे दर जाहीर होत असतात. रोज सोन्याचे दर बदलत आहेत. आजदेखील सोन्याचे दर वाढले आहेत. ऐन लग्नसराईत सोनं महागलं असल्याने आता सोन्याचे दागिने बनवायचे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चांदीचे दर वाढले (Silver Price Hike)
सोन्यानंतर चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. १ किलोमागे चांदी जवळपास ५००० रुपयांनी महागली आहे. हे दर २,७०,००० रुपये झाले आहेत. १०० ग्रॅममागे चांदीचे दर ५०० रुपयांनी वाढले असून हे दर २७,००० रुपये झाले आहे. १० ग्रॅममागे चांदी ५० रुपयांनी महागली आहे. हे दर २,७०० रुपये आहेत.
२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,५२,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २६४ रुपयांनी वाढले असून हे दर १,२१,९६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३,३०० रुपयांनी महागले असून हे दर १५,२४,६०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३०० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,३९,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं २४० रुपयांनी महागलं असून हे दर १,११,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३००० रुपयांनी महागलं असून हे दर १३,९७,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)
आज १८ कॅरेटमागे सोन्याचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१४,३४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९१,४७२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ११,४३,४०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.