Gold Rate Today : लग्नसराईच्या तोंडावर सोने - चांदीचे दर घसरले, तुमच्या शहरातील आजचे दर? जाणून घ्या

Gold Silver Price Today : ४ मे रोजी भारतात सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. आजचे ताजे दर आणि बाजारातील परिस्थिती जाणून घ्या.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary
  • ४ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण

  • लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना दिलासा

  • २४ कॅरेट सोनं 15,092 रुपये प्रति ग्रॅम

  • चांदीचा दर 264.90 रुपये प्रति ग्रॅम

लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लग्नासाठी सोन्याची खरेदी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विशेषतः मंगळसूत्र, हार, चैन, अंगठ्या अशा दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अशा परिस्थितीत ४ मे रोजी सोन्याच्या दरात झालेली घसरण ही ग्राहकांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.

आजच्या ताज्या दरांनुसार, भारतात २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 15,092 रुपये इतका नोंदवला गेला आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 13,834 रुपये असून १८ कॅरेट सोन्याचा दर 11,319 रुपये आहे. जर १० ग्रॅम दरांचा विचार केला तर २४ कॅरेट सोन्याचा दर 1,50,920 रुपये, २२ कॅरेटचा 1,38,340 रुपये आणि १८ कॅरेटचा 1,13,190 रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही किरकोळ घसरण दिसून आली आहे. आज चांदीचा प्रति ग्रॅम दर 264.90 रुपये असून प्रति किलोग्रॅम दर 2,64,900 रुपये इतका आहे.

Gold Rate Today
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

३ मे रोजी सोन्याचे दर किंचित जास्त होते. ३ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 15,093 रुपये, २२ कॅरेटचा 13,835 रुपये आणि १८ कॅरेटचा 11,320 रुपये होता. १० ग्रॅमसाठी हे दर अनुक्रमे 1,50,930 रुपये, 1,38,350 रुपये आणि 1,13,200 रुपये इतके होते. चांदीचा दर देखील 265 रुपये प्रति ग्रॅम आणि 2,65,000 रुपये प्रति किलो होता.

Gold Rate Today
Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

दरातील ही घसरण जरी छोटी असली तरी मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ती फायदेशीर ठरत आहे. विशेषतः लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढत असताना दर कमी झाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा दर आणि मागणी-पुरवठ्याचे समीकरण यावर सोन्या-चांदीचे दर अवलंबून असतात. येत्या काही दिवसांतही दरात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी खरेदी करताना बाजारभावावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com