Today's Gold Rate saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे २४,५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today 26th January 2026: सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याचे दर १० तोळ्यामागे २४,५०० रुपयांची वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर वाचा.

Siddhi Hande

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं

सोन्याचे दर २,४५० रुपयांनी वाढले

सोन्याचे दर १,६२,७१० रुपयांच्या घरात

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. आज सोनं २,४५० रुपयांनी महागलं आहे. प्रति तोळ्यामागे जवळपास अडीच हजारांची वाढ झाली आहे. १ तोळ्यामागे १,६२,७१० रुपये मोजावे लागणार आहे.

सोन्याचे मागच्या आठवड्यात दीड लाखांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर हे दर सतत वाढत गेले. मागच्या पूर्ण आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहे. त्यानंतर आजही आठवड्याच्या सुरुवातीला सोनं महागलं आहे.

सोन्याचे आजचे दर किती? (Gold Rate Today In India)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर २,४५० रुपयांनी वाढले असून १,६२,७१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १९६० रुपयांनी महागलं असूल १,३०,१६८ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २४,५०० रुपयांनी वाढले असून १६,२७,१०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर २,२५० रुपयांनी वाढले असून १,४९,१५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,८०० रुपयांनी महागलं असून १,१९,३२० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २२,५०० रुपयांनी वाढले असन १४,९१,५०० रुपये झाले आहे.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर १,८४० रुपयांनी वाढले असून १,२२,०३० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,४७२ रुपयांनी महागलं असून ९७,६२४ रुपये झालं आहे. १० तोळ्यामागे सोन्याच दर १८,४०० रुपयांनी वाढले असून १२,२०,३०० रुपये झाले आहेत.

चांदीचे दर

आज चांदीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. १ किलोमागे चांदीचे दर ५००० रुपयांनी वाढले आहे. हे दर ३,४०,००० रुपये झाले आहे. चांदीचे दरदेखील मागच्या आठवड्यापासून सतत वाढताना दिसत आहे. १० ग्रॅममागे चांदीचे दर ५० रुपयांनी वाढले असून ३,४०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा लेक करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये Wild card एन्ट्री; 'त्या' स्पर्धकाला पाहताच सदस्यांना बसला 440 व्होल्टचा धक्का| VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दिलासा, eKYC साठी मिळणार मुदतवाढ?

Heart Attack कमी तरी मृत्यूचं कारण तेच! या सवयी हृदयासाठी घातक, डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT