Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate: सोनं १२,४८९ रुपयांनी स्वस्त, तर चांदीचे दर ₹४०,०००नी घसरले; इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

Gold Silver Rate Fall: सोने-चादीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. इराण-इस्त्रायल युद्धामुळे सोने-चांदीचे दर घसरत आहेत. या काळात सोनं १२४८९ रुपयांनी तर चांदी ४०,००० रुपयांनी घसरली आहे.

Siddhi Hande

इराण-इस्त्रायल युद्धाचा सोने चांदीवर परिणाम

सोने-चांदीचे दर घसरले

युद्धाच्या काळाता सोनं १२ हजार तर चांदी ४०,००० रुपयांनी घसरली

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. एकीकडे एलपीजी, पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. तर दुसरीकडे सोन्याच्या दरावर मात्र वेगळाच परिणाम होताना दिसत आहे.इराण- इस्त्रायल युद्धामुळे सोने चांदीचे दर घसरले आहेत.त्याआधी सोने चांदीचे दर सतत वाढत होते. युद्धामुळे सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

आखाती देशांमधील या युद्धांमुळे सोन्याचे दर आतापर्यंत १२४८९ रुपयांची घसरण झाली आहे. तर युद्धाच्या कालावधी चांदीचे दर ४०,००० रुपयांनी घसरले आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवर तणाव असला तरीही सोने-चांदीची मागणी वाढताना दिसत आहे. ही गुंतवणूक सुरक्षित असल्याने अनेक लोक सोने-चांदी खऱेदी करताना दिसत आहेत.

आयबीजेएच्या दरानुसार, २७ फेब्रुवारीला सोन्याचा दर १,५९,०९७ रुपये होता. तर चांदीचे दर २,६५,९०० रुपये झाले होते. २८ फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली.यानंतर हे दर घसण्यास सुरुवात झाली. जागतिक बाजारात ५,४०० डॉलरच्या घरात पोहचलेल्या सोन्याची किंमत १२१ डॉलरने कमी झाले. हे दर सध्या ४,७२० डॉलरवर आहे. चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे.

सोने चांदीचे दर घसरण्याची कारणे (Why Gold Silver Rate Fall)

मऍकग्वायर यांनी सोने-चांदीच्या दरातील घसरणीची कारणे सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या १० वर्षांच्या बाँडवरील परतावा ४.३६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केला आहे. याचसोबत सध्याच्या तणावामुळे कच्चे तेल आणि एलपीजी गॅस खरेदीवर गुंतवणूक वाढत आगे. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरले आहे. याचसोबत शेअर मार्केटमधील घसरण आणि डॉलरचे मजबुतीकरण याचादेखील सोने-चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भोंदू खरातचा लग्नाचा कारनामा; हळदीच्या वेळी अंगावरचा शर्ट काढत नव्हता, धक्कादायक कारण समोर

Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू

काँग्रेसच्या खासदाराचा तडकाफडकी राजीनामा! राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

SCROLL FOR NEXT