Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Price Fall: सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे जवळपास १००० रुपयांची घसरण झाली आहे. वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Siddhi Hande

सोन्याचे दर पुन्हा घसरले

सलग दुसऱ्या दिवशी सोन्यच्या दरात घसरण

आजचे सोन्याचे दर वाचा

सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याचे दर कालपासून घसरत आहे. आजदेखील हे दर कमी झाले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे म्हटले तरी चालेल. गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्यांने वाढत आहेत. एकदा तर सोन्याचे तर १.८० हजारांच्या घरात गेले होते. त्यानंतर हे दर कमी होऊन १.६० हजारांपर्यंत आले आहेत. आज सोन्याचे दर १,६१,२४० रुपये झाले आहेत.

आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,६१,२४० रुपये झाले आहेत. कालदेखील सोन्याची किंमत कमी झाली होती. भविष्यात हे दर आणखी कमी व्हावेत, अशी अपेक्षा आहेत. सोन्याचे दर कमी झाले असले तरीही हे दर दीड लाखांच्या पुढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

आज सोन्याचे दर घसरले (Gold Price Fall)

आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,६१,२४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ७८४ रुपयांनी घसरले असून हे दर १,२८,९९२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ९,८०० रुपयांनी घसरले आहेत हे दर १६,१२,४०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९०० रुपयांनी घसरले आहेत हे दर १,४७,८०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ७२० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १,१८,२४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ९००० रुपयांनी घसरले असून १४,७८,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७४० रुपयांनी घसरले आहेत हे दर १,२०,९३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ५९२ रुपयांनी स्वस्त झालं असून ९६,७४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७,४०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १२,०९,३०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT