Todays Gold Price Saam Tv
बिझनेस

Todays Gold Price: सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी किंमत, वाचा 22, 24 कॅरेटचे ताजे दर

Gold Rate Today Fall: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. २२ अन् २४ कॅरेटचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर घसरले असले तरी ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात घसरण

१ तोळ्यामागे २७० रुपयांची घसरण

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात आजदेखील घसरण पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत. १ तोळ्यामागे २७० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, सोन्याचे दर काही दीड लाखांच्या खाली येत नाही.

सोन्याच्या दरात घसरण (Gold Rate Fall)

सोन्याच्या दरात १ तोळ्यामागे २७० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,५८,५१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २१६ रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२६,८०८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,७०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १५,८,१०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटच्या सोन्यामागे २५० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,४५,३०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २०० रुपयांनी घसरले असून १,१६,२४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १४,५३,००० रुपये झाले आहे.

१८ कॅरेटमागे सोन्याचे दर २०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१८,८९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६० रुपयांनी घसरुन ९५,११२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ११,८८,९०० रुपये झाले आहेत.

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असते. सोन्याचे दर १.८० लाखांवर पोहचले होते त्यानंतर आता हे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

चांदीचे दर

आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहेत.चांदीचे दर १ किलोमागे २,९०,००० रुपये झाले आहेत. १०० ग्रॅम सोन्याचे दर २९,००० रुपये झाले आहेत. सोने-चांदीचे दर सतत घसरत असल्याने सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. भविष्यात हे दर अजून कमी व्हावेत, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अधिक मास कधी संपणार? जाणून घ्या धोंड्याच्या महिन्याचा शेवटचा दिवस

Chanakya Niti : तुमच्या आजुबाजूला असणाऱ्या धोकेबाज लोकांना कसं ओळखाल? चाणक्यांनी सांगितलं भयानक सत्य

Maharashtra News Live Update: मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज बाद, काँग्रेस आक्रमक

Purushottam Puri Boat Accident: पुरुषोत्तम पुरी बोट दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू, मृत महिलांसह जखमींची नावं आली समोर

भारताच्या शेजारी देशात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; सर्वच जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT