Gold Price Today  saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात १९६०० रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price Today: सलग पाचव्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं १९,६०० रुपयांनी स्वस्त झाले. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांनी घसरण झाली. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर...

Priya More

Summary -

  • सलग पाचव्या दिवशी भारतात सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेटचे १० तोळा सोनं तब्बल १९,६०० रुपयांची स्वस्त

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण

  • आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी

इराण -इस्राइल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरात पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची चिंता आहे. तर दुसरीकडे या युद्धादरम्यान सोनं-चांदीच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान सोनं-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण भारतात सोन्याचे दर कमी होताना दिसत आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोनं १,९६० रुपयांनी स्वस्त झाले. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी घसरण झाली. तर १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील दर किती आहेत ते जाणून घ्या....

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,९६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,६१,६८० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १९,६०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १६,१६,८०० रुपये मोजावे लागणार आहेत.

२४ कॅरेटसोबतच २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,८०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,४८,२०० रुपये खर्च करावे लागतील. तर १० तोळा सोनं १८,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,८२,००० रुपये द्यावे लागणार आहे.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झाले आहे.१८ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२१,२६० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १२,१२,६०० रुपये मोजावे लागणार आहे. २४,२२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तुमच्या शहरातील २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती?

मुंबई - १६,१६८ रुपये

पुणे - १६,१६८ रुपये

नागपूर- १६,१६८ रुपये

चेन्नई - १६,३०९ रुपये

दिल्ली - १६,१८३ रुपये

कोलकाता - १६,३६३ रुपये

बंगळुरू - १६,१६८ रुपये

हैदराबाद- १६,१६८ रुपये

अहमदाबाद - १६,१७३ रुपये

तुमच्या शहरातील २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती?

मुंबई - १४,८२० रुपये

पुणे - १४,८२० रुपये

नागपूर- १४,८२० रुपये

चेन्नई - १४,९५० रुपये

दिल्ली - १४,८३५ रुपये

कोलकाता - १४,८२० रुपये

बंगळुरू - १४,८२० रुपये

हैदराबाद- १४,८२० रुपये

अहमदाबाद - १४,८२५ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT