Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे २७०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today 8th January 2026: सोन्याच्या दरात गेल्या महिन्यांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात किंचिंत घसरण पाहायला मिळत आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

प्रति तोळ्यामागे २७० रुपयांची घसरण

२२ अन् २४ कॅरेटचे दर वाचा

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. अनेकजण सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. सोन्याचे दर कमी होईल, याची वाट बघत अनेकजण आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर काही कमी होताना दिसत नाही. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचिंत घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २७० रुपयांनी घसरण झाली आहे. वाचा आजचे सोन्याचे दर.

आजचे दर वाचा (Gold Rate Today)

२४ कॅरेटचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे २७० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३८,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २१६ रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१०,४०० रुपये झाले आहेत. तर दहा तोळ्यामागे जवळपास २७०० रुपयांची घसरण होऊन हे दर १३,८०,००० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर २५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२६,५०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २०० रुपयांनी कमी झाले असून १,०१,२०० रुपये झाले आहेत.१० तोळ्यामागे सोन्याचे दर २,५०० रुपयांनी घसरले असून १२,६५,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे सोन्याचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,०३,५०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६८ रुपयांनी कमी झाले असून ८२,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २१०० रुपयांनी घसरले असून १०,३५,००० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

...तर अजितदादा माझ्याशी बोलले असते; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या CM फडणवीसांचं मोठं भाष्य

Pav Bhaji Khakhra: घरीच बनवा कुरकुरीत पावभाजी खाकरा; सोपी रेसिपी वाचा

Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

SCROLL FOR NEXT