Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: खरेदीदारांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Gold Price Today Fall: सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर पुन्हा घसरले

१० तोळ्यामागे २० हजारांची घसरण

आजचे सोन्याचे दर वाचा

सोन्याच्या दरात मागच्या आठवड्यापासून सतत चढ-उतार होताना दिसत आहे. एक आठवड्याआधी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोन्याचे दर १.८० लाखांवर गेले होते. त्यानंतर पुन्हा हे दर कमी होत आहेत.मागच्या आठवड्यात सलग ५ दिवस सोन्याचे दर घसरले होते. त्यांतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात आज प्रति तोळ्यामागे २०७० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,५२,३५० रुपये झाले आहेत. वाचा आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेटचे दर (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २०७० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५३,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,६५६ रुपयांनी घसरले आहेत. हे भाव १,२१,८८० रुपये झाले आहेत.१० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची घसरण झाली आहे.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,९०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३९,६५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,५२० रुपयांनी घसरले असून हे दर १,११,२७० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं १९००० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १३,९६,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर(18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,५६० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१४,२६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,२४८ रुपयांनी घसरून ९१,४०८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,६०० रुपयांनी घसरले असून हे दर ११,४२,६०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakshi Mahajan And Atahrv Karve Wedding: सात वर्षांचं प्रेम अन् आयुष्यभराची साथ! साक्षी महाजन-अथर्व कर्वे अडकले लग्नबंधनात

Maharashtra Live News Update: अमरावती महानगरपालिकेत महापौर पदी भाजपा महायुतीचे श्रीचंद तेजवानी यांची निवड

BP Medicine: हाय BP च्या औषधांनी 'ही' गंभीर समस्या होते दुर्लक्षित, वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती

CBSE Class 10, 12 Admit Card: विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट घेतलं का? प्रवेशपत्र कसे कराल डाउनलोड, जाणून घ्या महत्त्वाच्या सुचना

मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा! दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT