सोन्याच्या दरात घसरण
सलग ५ दिवसांपासून सोन्याचे दर घसरलेट
१० तोळ्यामागे १४,२०० रुपयांची घसरण
सोन्याच्या दरात अचानक घट होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. १ तोळा सोन्याची किंमत जवळपास १.८० लाखांवर गेली होती. त्यानंतर आता मात्र, खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या पाच दिवसांपासून सोन्याचे दर सतत घसरत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेटचे दर (24k Gold Rate)
गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४२० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५१,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे १,१३६ रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,२१,४०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १४,२०० रुपयांनी घसरले असून हे दर १५,१७,५०० झाले आहेत.
२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर १,३०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३९,१०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,०४० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,११,२८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १३,००० रुपये झाले आहेत हे दर १३,९१,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)
१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १०७० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१३,८१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ८५६ रुपयांची घसरण होऊन हे दर ९१,०४८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १०,७०० रुपयांनी घसरले असून हे दर ११,३८,१०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.