Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Rate Today Hike: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांची वाढ झाली आहे. आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर वाचा.

Siddhi Hande

सोन्याचे दर वाढले

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं

वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

आज सोने-चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. रोज सोने-चांदीच्या दरात बदल होत असतो. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोनं महागलं आहे. प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांचे टेन्शन मात्र वाढलं आहे.

मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली होती. सलग ६ दिवस सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. त्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. ऐन लग्नसराईत सोनं महागल्याने खरेदीदारांच्या मनात सोनं घ्यावं की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी महागले आहेत. सोन्याचे दर १ तोळ्यामागे १,५४,४२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३०४ रुपयांनी महागले असून हे दर १,२३,५३६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३,८०० रुपयांनी महागलं असून हे दर १५,४४,२०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४१,५५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २८० रुपये झाले आहेत. हे दर १,१३,२४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३,५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १४,१५,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18k old Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २९० रुपयांनी महागलं असून हे दर १,१५,८२० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोनं २३२ रुपयांनी महागलं असून हे दर ९२,६५६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,९०० रुपयांनी वाढले असून हे दर ११,५८,२०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Mumbai: साकीनाका मॅनहोल दुर्घटना; मुंबई महापालिकेचे ४ अधिकारी तडकाफडकी निलंबित

SCROLL FOR NEXT