Gold- Silver Price Today google
बिझनेस

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल, सोन्याचा भाव वाढला की घसरला; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात आज वाढ झाली तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती आहेत...

Priya More
  • सोनं-चांदीच्या दर घसरणीला आज ब्रेक लागला

  • सोन्याच्या दरात आज वाढ झाली तर चांदीचे दर स्थिर आहेत

  • १० तोळा सोन्याचे दर १००० रुपयांनी वाढले

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दर घसरणीला ब्रेक लागला. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीचे दर स्थिर आहेत. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १०० रुपयांनी महागलं. तर चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही. आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर त्यापूर्वी सोनं- चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १०० रुपयांची महागले. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४२,५८० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,००० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,२५,८०० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील वाढ झाली. २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर १०० रुपयांनी वाढले. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३०,७०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,००० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,०७,००० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचे सोनं देखील महागले आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०६,९४० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १०,६९,४०० रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, आज चांदीचे दर मात्र स्थिर आहे. आज १ ग्रॅम चांदी २२० रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी २,२०,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये सीएनजी दरात अचानक 5 रुपयांची वाढ

Political News : मोठी बातमी! खासदाराची अचानक तब्ब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात केले दाखल

CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं

Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा! आरोपींना मिळत होते तपासाचे धागेदोरे, कोण पुरवत होतं अपडेट्स?

SCROLL FOR NEXT