संजय महाजन, जळगाव
जळगावच्या सुवर्ण बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन्ही सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आजही चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोन्याचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात दरांमध्ये सतत बदल होत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर दर खाली आल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली. सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीला विशेष महत्त्व असल्याने अनेक ग्राहक दरातील बदलांकडे लक्ष ठेवून आहेत. आज बाजारात चांदीच्या किमतीत प्रति किलो 6,000 रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, सोन्याच्या दरातही प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
जळगावच्या बाजारात सोन्याचा दर 1000 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,43,500 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर 6000 रुपयांनी घसरून प्रति किलो 2,05,000 पाच हजार रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा हा दर जीएसटीशिवाय आहे.
दरातील या घसरणीमुळे आगामी काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, मागणी आणि इतर आर्थिक घडामोडींनुसार किमतीत पुन्हा बदल होऊ शकतात. येत्या काही दिवसांत या दरांमध्ये आणखी घसरण होते की पुन्हा वाढ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.