Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांना 'तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी थेट हो किंवा नाही असे उत्तर न देता, आपल्या भूमिकेबद्दल आणि कामाच्या अनुभवाबद्दल सविस्तर भाष्य केले. पुण्यातील 'युवा महोत्सवा' या कार्यक्रमादरम्यान त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असे विचारले होते. त्यावर तुकाराम मुंढे म्हणाले की, या गोष्टी विश लिस्टचा भाग आहेत, पण त्यांची अशी कोणतीही विश लिस्ट नाही.
या प्रश्नाचे उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले की, त्यांच्या बोलण्यापूर्वीच इतरांनी त्याचे वेगवेगळे अर्थ काढून घेतले आहेत. त्यांनी दहा वर्षांपूर्वीचे उदाहरण देत सांगितले की, २०१६ मध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांची नवी मुंबई आयुक्तपदी बदली झाली होती . त्या वेळी जर कोणी त्यांना 'पुढे तुम्ही एफडीए आयुक्त होणार का?' असे विचारले असते, तर ते काय सांगू शकले असते?
कोणतीही व्यक्ती, भूमिका किंवा संस्था आपल्याला तेव्हाच भावते आणि आवडते, जेव्हा आपण तिच्याशी जोडले जातो, ती जगतो आणि तिचा अनुभव घेतो, असे त्यांनी नमूद केले. शेवटी, आज आपण ज्या परिस्थितीत आणि ज्या ठिकाणी आहोत, तिथली भूमिका आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे; पुढे काय व्हायचे हे काळ ठरवेल, असे म्हणत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.