Gold- Silver Price Today google
बिझनेस

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल, आज स्वस्त झालं की महाग? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाली नाही तर चांदीचे दर घसरले आहेत.

Priya More
  • दिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • आज २४-२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर स्थिर

  • सोन्याच्या दरात कोणताही बदल न झाल्याने आज खरेदीची चांगली संधी

  • १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली

दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त होण्याऐवजी वाढतच चालले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाली नाही तर चांदीचे दर घसरले. आज १ तोळा सोनं १,४३,९५० रुपयांना विकले जात आहे. तर आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांची घसरण झाली. आज सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी दर किती आहेत ते घ्या जाणून...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४३,९५० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १४,३९,५०० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३१,९५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,१९,५०० रुपये मोजावे लागतील. तर आज १८ कॅरेट सोन्याचे दर देखील स्थिर आहेत. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०७,९६० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १०,७९,६०० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान, आज सोन्याचे दर स्थिर आहेत पण चांदी मात्र स्वस्त झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली ही चांदी २१५ रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,१५,००० रुपये खर्च करावे लागतील. आज चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवरील गोळीबारामागचा नेमका हेतू काय? आरोपींचा धक्कादायक दावा

Maharashtra News Live Update : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा मतभेद; दोन युवा नेत्यांच्या नियुक्त्यांवर आक्षेप

Government Scheme : मुलींसाठी राज्य सरकारची ‘कन्या उडान योजना', नेमकं सत्य काय? जाणून घ्या

MLC Result: विधानपरिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वादाची ठिणगी, भाजपने पराभवाचं खापर शिंदेसेनेवर फोडलं

Cholesterol Control: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज प्या या 2 मसाल्यांचं पाणी? साचलेली चरबी झटक्यात वितळेल

SCROLL FOR NEXT