Shreya Maskar
हिवाळ्यात बाजारात अनेक ताज्या आणि पौष्टिक भाज्या उपलब्ध होतात. या हंगामी भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत निरोगी राहण्यासाठी ५ भाज्यांचा आहारात नक्की समावेश करा.
पालकामध्ये लोह, फोलेट, जीवनसत्त्व के आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. रक्तपेशींची निर्मिती आणि हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पालक आहारात समाविष्ट करू शकता.
मेथीच्या पानांमध्ये फायबर, लोह आणि विविध जीवनसत्त्वे असतात. पचनक्रिया सुधारण्यास आणि संतुलित आहार राखण्यास मेथीची भाजी मदत करू शकते.
मुळ्यामध्ये पाणी, फायबर आणि जीवनसत्त्व सी असते. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि शरीराला पोषक घटक मिळवून देण्यासाठी मुळा फायदेशीर ठरतो.
फ्लॉवरमध्ये जीवनसत्त्व सी, के आणि फायबर आढळते. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.
कोबीमध्ये फायबर, जीवनसत्त्व सी आणि के असते. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवण्यासाठी कोबीचा आहारात समावेश करा.
शेवग्याच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व अ आणि सी यांसारखे पोषक घटक असतात. हाडांचे आरोग्य आणि शरीराचे सामान्य कार्य चांगले राखण्यासाठी ही पाने आहारात समाविष्ट करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.