High Blood Pressure : वाढलेला रक्तदाब कसा कमी कराल? आजपासूनच लाइफस्टाइमध्ये करा 'हे' ७ बदल

Shreya Maskar

उच्च रक्तदाब

आजकाल बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि वाढता मानसिक ताण यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. रक्तदाब दीर्घकाळ नियंत्रणाबाहेर राहिल्यास हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि डोळ्यांच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

High Blood Pressure | pinterest

आहारातील मिठाचे प्रमाण

उच्च रक्तदाबाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आहारात मिठाचे अतिप्रमाण. मिठामध्ये सोडियम असते. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यास शरीरात पाणी साचण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

Salt | pinterest

फळे - हिरव्या पालेभाज्या खा

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. पोटॅशियम शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकते.

Fruits and Green Leafy Vegetables | pinterest

दररोज व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. दररोज ३० मिनिटे चाला.

Exercise Daily | pinterest

वजन नियंत्रणात ठेवा

वाढलेले वजन आणि लठ्ठपणा यांचा उच्च रक्तदाबाशी संबंध असतो. शरीराचे वजन वाढल्यास हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.

weight | pinterest

पुरेशी झोप घ्या

झोपेचा अभाव आणि अनियमित झोप यांचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. झोपताना शरीराला विश्रांती मिळते आणि हृदय व रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते. दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.

sleep | pinterest

धूम्रपान- मद्यपान टाळा

धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच मद्यपानामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान पूर्णपणे सोडणे आणि मद्यपान टाळणे फायदेशीर ठरते.

Avoid smoking and alcohol consumption | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : कडाक्याच्या थंडीत सकाळी चालायला जाताय? 'या' ३ चुका टाळा, आरोग्याचं होणार नाही नुकसान

Winter Walking | AI PHOTO
येथे क्लिक करा...