Gold Rate Today: सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक, सोनं ५,४०० रुपयांनी महागले; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold Rates Rise Again: आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. तर चांदीचे दर घसरले. खरेदीसाठी जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती?
Gold Rate Today: सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक, सोनं ५,४०० रुपयांनी महागले; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rates Rise Again meta ai
Published On: 
  • आज सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला

  • सोन्याच्या १८-२२ आणि २४ कॅरेटच्या दरात मोठी वाढ झाली

  • चांदीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत

सोनं-चांदीच्या दरामध्ये आज मोठा बदल झाला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीचे दर मात्र स्थिर राहिले. गेल्या काही दिवासांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती पण या घसरणीला ब्रेक लागला. सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. दर वाढल्यामुळे ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी कमी दिसत आहे. आज १ तोळा सोन्याचे दर ५४० रुपयांनी वाढले. आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर त्यापूर्वी सोनं- चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज वाढ झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५४० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४३,२९० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,४०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,३२,९०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक, सोनं ५,४०० रुपयांनी महागले; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्या- चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर ५०० रुपयांनी वाढले. हे c खरेदीसाठी ग्राहकांना १,३१,३५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,००० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,१३,५०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक, सोनं ५,४०० रुपयांनी महागले; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याचे दर देखील वाढले आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५१० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०७,५७० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याचे दर ५,१०० रुपयांनी वाढले. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १०,७५,७०० रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, आज चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी २२० रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी २,२०,००० रुपयांना विकली जात आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक, सोनं ५,४०० रुपयांनी महागले; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठा बदल! २४, २२ आणि १८ कॅरेटचे नवे भाव वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com