Today Gold Rate  google
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आज गुड न्यूज आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती ते घ्या जाणून...

Priya More
  • सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली

  • आज १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २५१० रुपयांची घसरण झाली

  • आज २४ कॅरेट सोन्यापाठोपाठ २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर देखील घसरले

  • १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची घसरण झाली

Gold Silver Rate Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सोनं-चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २५१० रुपयांची घसरण झाली. तर आज १ किलो चांदीच्या ५००० रुपयांची घसरण झाली. आज सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी १८-२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं २५१० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५०,१७० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५,१०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,०१,७०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर २४ कॅरेटचे सोनं खरेदीची चांगली संधी आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं २३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३७,६५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २३,००० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,७६,५०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात. त्यामुळे आज तुम्ही २२ कॅरेटच्या सोन्याचे दागिने खरेदी करू शकता.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १८८० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१२,६३० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १८,८०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,२६,३०० रुपये खर्च करावे लागतील. तुम्हा आज १८ कॅरेटचे सोन्याचे दागिने देखील खरेदी करू शकता.

दरम्यान, आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दर आज स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ५ रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २४० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,४०,००० रुपये खर्च करावी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

SCROLL FOR NEXT