Gold rate today India  साम टीव्ही मराठी
बिझनेस

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल, वाचा २२k, २४k सोन्याचे प्रति तोळा दर

gold rate today in India Akshaya Tritiya update : अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २२k, २४k आणि १८k सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold rate today, Akshaya Tritiya gold price : जागतिक बाजारात डॉलरची किंमत घसरल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिका आणि इराण या दोन देशातील चर्च पुन्हा एकदा सुरू होईल, असे संकेत मिळाल्यानंतर सोन्याच्या किंमतीला झळाळी मिळाली. त्यातच भारतामध्ये अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीचा ट्रेंड आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याची किंमतीत वाढ झाल्याची नोंद आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा + ₹1,420 रूपये इतकी वाढ झाली आहे. मुंबई, पुण्यापासून ते जळगाव आणि दिल्ली-कोलकात्यापर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

अक्षय्य तृतीया अवघ्या चार ते पाच दिवसांवर आली आहे. त्याआधीच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १५,५३५ रुपयांवर पोहचलाय. प्रति ग्रॅम सोन्याच्या दरात १४२ रुपयांची वाढ नोंदण्यात आली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १३० रुपयांनी वाढून १४,२४० रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ११,६५१ रुपये झाला असून त्यामध्ये १०६ रूपयांची वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १४२० रूपयांनी वाढला आहे. आज सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत १,५५,३५० रुपये इतकी झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याच्या भावातही बदल झाला असून प्रति तोळा १३०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹१,४२,४०० झाली आहे. १८ कॅरेटचे सोने १०६० रूपयांनी वाढून 11,65,10 रूपयांवर पोहचलेय.

तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती? (प्रति ग्रॅम)

चेन्नई

२४ कॅरेट - ₹१५,६२२

२२ कॅरेट - ₹१४,३२०

१८ कॅरेट - ₹११,९४०

मुंबई

२४ कॅरेट - ₹१५,५३५

२२ कॅरेट - ₹१४,२४०

१८ कॅरेट - ₹११,६५१

दिल्ली

२४ कॅरेट - ₹१५,५५०

२२ कॅरेट - ₹१४,२५५

१८ कॅरेट - ₹११,६६६

कोलकाता

२४ कॅरेट - ₹१५,५३५

२२ कॅरेट - ₹१४,२४०

१८ कॅरेट - ₹११,६५१

बेंगळुरू

२४ कॅरेट - ₹१५,५३५

२२ कॅरेट - ₹१४,२४०

१८ कॅरेट - ₹११,६५१

हैदराबाद

२४ कॅरेट - ₹१५,५३५

२२ कॅरेट - ₹१४,२४०

१८ कॅरेट - ₹११,६५१

पुणे

२४ कॅरेट - ₹१५,५३५

२२ कॅरेट - ₹१४,२४०

१८ कॅरेट - ₹११,६५१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा? खासगी क्लासच्य़ा संचातले 100 पैकी 85 प्रश्न

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिक आक्रमक, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

Wednesday Horoscope : धनलाभ होणार, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लागणार बंपर लॉटरी

राज्यात बनावट खत विक्रीचं रॅकेट? नामांकित कंपनीच्या नावाखाली गोरखधंदा, शेतकऱ्यांच्या लुटीचं सत्र कधी थांबणार?

SCROLL FOR NEXT