Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याचे दर आज वाढले की घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर वाढले की कमी झाले ते जाणून घ्या.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही

सोन्याचे दरात बदल न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा

वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे दर स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत होती. त्यानंतर आज जवळपास वर्षभराने सोन्याचे दर स्थिर आहेत. कालएवढेच सोन्याचे भाव आजदेखील आहेत. त्यामुळे आज खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

सोन्याचे दर १.८० लाखांवर पोहचले होते. त्यानंतर मागच्या १५ दिवसात सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर जवळपास २५-२६ हजारांनी घसरले आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांना खुशखबर मिळाली आहे.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,५४,२०० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,२३,३६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,४२,००० रुपये आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४१,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१३,०८० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर १४,१३,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१५,६५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ९२,५२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ११,५६,५०० रुपये झाले आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. आज चांदीचे दर प्रति १० ग्रॅममागे ५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर २,५५० रुपये झाले आहे. १०० ग्रॅममागे ५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर २५,५०० रुपये झाले आहेत. १ किलोमागे चांदीचे दर ५००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर २,५५,००० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...

Rohit Sharma : रोहित शर्माचा मराठमोळा ठसका, हास्यजत्रेच्या टीमसोबत मारल्या गप्पा| VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Cervical Cancer Screening: लक्षणं न दिसता शरीरात वाढत राहतो सर्व्हायकल कॅन्सर; ही एक छोटी टेस्ट वाचवेल तुमचा जीव

Lasooni Dal Tadka Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा 'लसूणी डाळ तडका' कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT