

सोन्यापाठोपाठ चांदीचे दर घसरले
२ दिवसात चांदीच्या दरात ८००० रुपयांची घसरण
१५ दिवसात चांदी १.८३ लाखांनी घसरले
सोने-चांदीचे दर सतत घसरत आहेत. सोने-चांदीच्या दरात घसरण होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले आहे. आज सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वर चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. या आठवड्यात १ किलो चांदी ८,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
चांदीच्या दरात एक किलोमागे मोठी घसरण झाली आहे. चांदीचे प्रति किलो १.८४ लाखांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचे दरदेखील घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १७०० रुपयांनी घसरले आहेत.
आजचे चांदीचे दर (Today Silver Rate)
आज सकाळीच चांदीचे दर ८,८५७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागच्या आठवड्यात चांदीचे दर २,४४,३६० रुपये होते. त्यानंतर सोमवारी हे दर २,३५,५०३ रुपये झाले आहे. चार दिवसात चांदी ८००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचे दर अजून घसरावेत अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.
चांदीचे दर मागच्या महिन्याच्या तुलनेत खूप स्वस्त झाले आहेत. २९ जानेवारी रोजी चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. हे दर ४,२०,०४८ रुपये झाले होते. त्यानंतर पुढच्या १५ दिवसात चांदीचे दर जवळपास दीड लाखांनी घसरले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर घसरले
चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरातदेखील चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे. १.८० लाखांवर असलेले सोन्याचे दर १,५४,१९१ रुपयांवर विकले जात आहे. सोन्याचे दर मागच्या काही दिवसात २४ हजारांनी घसरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.