Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे तब्बल ९८०० रुपयांची घसरण; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Fall: सोन्याचे दर आज घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांनी घसरले

आजचे सोन्याचे दर वाचा

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात गेल्या २-३ दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांची घसरण झाली आहे. जवळपास सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

सोन्याचे दर अनेक दिवसांपासून वाढत होते. प्रति तोळ्यामागे हे दर १,६१,००० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर आता हे दर कमी झाले आहेत. आजचे सोने चांदीचे दर जाणून घ्या.

२४ कॅरेटचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांनी घसरले असून हे दर १,५६,९३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ७८४ रुपयांनी घसरले असून हे दर १,२५,५४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ९,८०० रुपयांनी वाढले असून हे दर १५,६९,३०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४३,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ७२० रुपयांनी घसरले असून १,१५,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ९००० रुपयांनी घसरले असून हे दर १४,३८,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७३० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१७,७०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५८४ रुपयांनी घसरले असून हे दर ९४,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ७,३०० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर ११,७७,००० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक सामाजिक न्याय भवनावर चढले मराठा तरुण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

Maratha bandh : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! बीडसह उद्या ४ जिल्हे कडकडीत बंद; काय सुरू आणि काय बंद? पाहा संपूर्ण यादी

Thick Hair Tips : तुम्हालाही लांब, घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग हे ६ घरगुती उपाय नक्की करा

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

SCROLL FOR NEXT