Shruti Vilas Kadam
आयकर विभागाच्या नियमांनुसार विवाहित महिलांना ५०० ग्रॅमपर्यंत सोने ठेवण्याची परवानगी आहे. यासाठी कोणतीही चौकशी केली जात नाही.
अविवाहित महिलांना २५० ग्रॅमपर्यंत सोने ठेवण्याची मुभा आहे. मर्यादित सोन्यावर कारवाई होत नाही.
घरातील पुरुष सदस्यांना १०० ग्रॅमपर्यंत सोने ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त सोने असल्यास कागदपत्रांची आवश्यक असतात.
घरात जास्त प्रमाणात सोने असल्यास त्याचे बिल, वारसाहक्काचे पुरावे किंवा उत्पन्नाचे मार्ग कोणते याचे पुरावे दाखवणे आवश्यक असते.
कुटुंबाकडून वारसाहक्काने मिळालेले सोने ठेवण्यास परवानगी असली तरी त्याचे पुरावे असणे गरजेचे आहे.
आयकर विभागाच्या छाप्यादरम्यान वरील मर्यादेतील सोने जप्त केले जात नाही. मात्र संशयास्पद व्यवहार आढळल्यास चौकशी होऊ शकते.
सोन्याची खरेदी करताना अधिकृत बिल घेणे आणि व्यवहारांची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळता येतात.