Office Etiquette Tips: तुम्ही कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टी कधीही करू नका, तुमची इमेज होईल खराब

Shruti Vilas Kadam

ऑफिसमध्ये सतत उशिरा पोहोचू नका

कामाच्या ठिकाणी वेळेचे महत्त्व खूप असते. वारंवार उशिरा येण्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते आणि वरिष्ठांचा विश्वास कमी होऊ शकतो.

interview etiquette

सहकाऱ्यांची चुगली किंवा वाद टाळा

ऑफिसमधील गॉसिप आणि इतरांविषयी चुकीच्या चर्चा केल्याने वातावरण बिघडू शकते. त्यामुळे सहकाऱ्यांशी व्यावसायिक नातं ठेवणं महत्त्वाचं आहे.

Office Etiquette Tips

कामाच्या वेळेत सोशल मीडियाचा अति वापर करू नका

मोबाईल आणि सोशल मीडियामुळे कामावर लक्ष केंद्रित होत नाही. यामुळे उत्पादकता कमी होऊन कामाची गुणवत्ता घसरू शकते.

Office Etiquette Tips

ऑफिसच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नका

ड्रेस कोड, मीटिंगचे नियम आणि ऑफिस पॉलिसी पाळणे आवश्यक असते. नियम मोडल्यास तुमच्या शिस्तीबद्दल चुकीचा संदेश जाऊ शकतो.

Office Etiquette Tips

इतरांच्या कामाचे श्रेय घेणे टाळा

टीमवर्कमध्ये प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. दुसऱ्यांच्या मेहनतीचे श्रेय घेतल्यास विश्वास कमी होऊ शकतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात.

Office Etiquette Tips

काम पुढे ढकलण्याची सवय सोडा

सतत काम टाळल्यामुळे डेडलाईन चुकू शकते आणि तणाव वाढू शकतो. वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Office Etiquette Tips | Pintrest

ऑफिसमध्ये वैयक्तिक समस्या जास्त शेअर करू नका

प्रत्येक गोष्ट सहकाऱ्यांसोबत शेअर केल्याने प्रोफेशनल प्रतिमा प्रभावित होऊ शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल ठेवणे आवश्यक आहे.

Office Etiquette Tips

Desk Job Workers Best Exercise: जर तुमची डेस्क जॉब करत असाल, तर हे ५ व्यायाम नक्की करा

Desk Job Workers Best Exercise
येथे क्लिक करा