Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल झाला का? वाचा आजचे दर

Today Gold Rate 28th July 2025: आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्यचे दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत होते. मात्र, आज हे दर स्थिर आहेत.

Siddhi Hande

  • सोन्याचे दर स्थिरावले

  • अनेक महिन्यानंतर सोन्याचे दरात कोणताही बदल नाही

  • प्रति तोळा सोन्याचे दर ९९,९३० रुपये

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सतत चढ-उतार होत आहेत. सोन्याच्या दरात सतत होत असणाऱ्या बदलामुळे खरेदीदारांना मात्र प्रश्न पडला आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. सणासुदीच्या दिवसात चांगला मूहूर्त साधत अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, आज खूप महिन्यानंतर सोन्याचे भाव स्थिर आहेत. सोन्याच्या दरात काहीही बदल झालेला नाही.

आज अनेक दिवसानंतर सोन्याचे दर एकही रुपयांनी घसरले नाही किंवा वाढले नाहीत. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करु शकतात. काल आणि आज सोन्याचे दर प्रति तोळा ९९,९३० रुपये आहेत. या दरात बदल केलेले नाहीत.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज २४ कॅरेट (24k Gold Rate) सोन्याचे दर प्रति तोळा ९९,९३० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,९४४ रुपये आहे. कालही हे दर सारखेच होते. १० तोळा सोन्याचे दर ९,९९,३०० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९१,६०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७३,२८० रुपये आहेत. तर १० तोळा सोन्याचे दर ९,१६,००० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ७४,९५० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५९,९६० रुपये आहे. १० तोळा सोन्याचीकिंमत ७,४९,५०० रुपये आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्याही दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर जैसे थे वैसे आहेत. आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ९२८ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत १,१६० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ११,६०० रुपये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar: पिवळ्या अनारकली ड्रेसमध्ये 'चंद्रा' च सौंदर्य खुललं, फोटो पाहा

Asia Cup India Squad : हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी, आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड

Maharashtra Rain Live News: रायगड जिल्ह्यात घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; जिल्ह्यातील १४ धरण ओव्हर फ्लो

Shocking Crime News : संभाजीनगर हादरले! लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकराची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीमुळे आरोपींचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT